प्रियाचा सगळ्यात आवडता ऋतू म्हणजे पावसाळा... बाहेर हलकासा पाऊस पडत होता. पावसामुळे बाहेरच वातावरण सुद्धा खूपच romantic झाल होत... तिला वाटत होत की अर्णवने लगेच तिला ऑफिस मधे pick up करावं आणि दोघांनी बाहेर भटकायला जाव.. तिने त्याला call केला पण त्याने तिचा call कट केला. तिला कळाले की तो busy आहे त्याशिवाय तो फोन कट करणार नाही. इकडे अर्णवला माहीत होत की आज प्रियाचा नक्कीच बाहेर भटकायचा मूड असेल. म्हणूनच तो पटकन काम संपवून तिला surprise देण्याचा प्लान करत होता. म्हणून त्याने मुद्दामच तिचा call घेतला नाही.
         अर्ध्या तासाच्या आत तो bike घेऊन तिच्या ऑफिस खाली येऊन थांबला. आणि त्याने तिला call केला की मी खाली आलो आहे पटकन ये. तिच्या चेहर्यावरचा आनंद पाहून तिच्या मैत्रिणीला लगेच कळाल की प्रियाचा भटकायला जायचा plan बनला वाटत... ती म्हणाली की मी सांगते बॉसला तू जा पटकन... प्रिया 5 मिनिटात खाली आली. तिच्या चेहऱ्यावरची smile पाहून अर्णवला हा प्लान बनवल्याच सार्थक वाटल.
         अर्णवच्या bike ने स्पीड घेतली आणि दोघही मग खडकवासल्याकडे निघाले. बाहेर पडणारा हलकासा पाउस दोघांनाही त्यांच्या लग्नाआधीच्या भेटींची आठवण करून देत होता. पावसाचा वेग हलकासा वाढला पण दोघांनाही त्याची काही पर्वा नव्हती... अर्णवला गाण्याची आवड होती. तो bike var मस्त गाणं गुणगुणत होता. प्रियाने त्याच्या पाठीवर डोकं टेकवल आणि ती सगळ्या गोष्टींचा मनसोक्तपणे आनंद घेत होती. मग दोघानाही थोडीशी भूक लागली. रस्त्यातच एका ठिकाणी थांबून त्यांनी मस्त कांदाभजी आणि वाफाळत्या चहाचा आनंद घेतला.
           काही वेळातच ते खडकवासल्याला पोचले. तिथे फारशी गर्दी नव्हती पण काही couples मात्र पावसाचा आनंद लुटायला तिथे आले होते. मग दोघही एका खडकावर बसले आणि त्यांनी पाण्यात पाय सोडले. पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य पण एकदम खुलून आल होत.
           कामाच्या गडबडीमुळे दोघांनाही काही दिवसात एकमेकांसाठी निवांतपणे वेळच मिळाला नव्हता. प्रियाला आधीपासूनच अर्णवचा अस मनातल ओळखून वागण्याचा स्वभाव खूप आवडायचा. आणि अर्णवला मात्र surprise मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तो मिळाल्याच समाधान बघायला खूप आवडायचं... त्याने तिचे हात हातात घेतले. कधी कधी बरच बोलायचं असत पण शब्दच सापडत नाहीत. तसच काहीसं आज झाल होत. आज ते काहींच न बोलता सगळ काही बोलत होते. तिला अस वाटत होत की हा क्षण इथेच थांबवा... बराच वेळ ते तिथे बसून राहिले. मग पावसाचा जोर हळूहळू वाढायला लागला. तशीही संध्याकाळ पण होऊन गेली होती. मग ते परत निघाले. प्रियाच्या मनात मात्र अशी अनपेक्षित अशी पावसातली "date" घर करून गेली...


        तो आणि ती ह्यांच लग्न होउन काही महिनेच झाले होते. आता कुठे ते एकमेकाना नीट ओळखायला लागले होते. तो म्हणजे एक प्रेमळ,समंजस आणि व्यवहाराच भान असणारा नवरा आणि ती पण एक थोडीशी हट्टी - चिडचिडी आणि हळवी बायको... पण ते दोघ नवरा बायको पेक्षा एकमेकांचे मित्र जास्त होते. एकमेकाना चिडवण,  रूसण, मनवण ह्यामुळे  त्यांच्या नात्यात गोडवा टिकून होता...
       दोघांनाही movies ची खूप आवड होती. असच ते एकदा TV पाहत असताना त्याना असे कळाले की एक contest आहे. आणि त्यात जे couple जिंकेल त्यांना त्या शो मधल्या host couple सोबत डिनर साठी जाता येणार आहे. त्यांना दोघांनाही त्या host couple ला भेटायची खूप इच्छा होती कारण ते त्यांचे आवडते कलाकार होते. त्यांनी सहजच गम्मत म्हणून त्या contest मधे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पाठवले आणि ते ह्या गोष्टीला विसरून पण गेले.
       एका दिवशी अचानक त्यांना फ़ोन आला की ते ही contest जिंकले आहेत आणि त्यांना डिनर साठी पुढच्या आठवड्यात मुंबईला जायचे आहे. ते दोघे पुण्याला रहात असल्यामुळे त्यांना जाणे काही अवघड नव्हते. मग दोघांनीही त्या खास दिवसासाठी मस्त shopping केली आणि आपल्या सगळ्या जवळच्या मित्र मैत्रिणीना पण सांगितले. सगळ्यांचे अभिनंदन झेलून दोघही मस्त मूड मधे होते त्या दिवशी. मग त्यांनी त्या शो मधल्या लोकांशी
फ़ोन वर बोलून भेटायची जागा वगरे सगळे माहित करून घेतले. ठरलेल्या दिवसाच्या एक दिवस आधी तिकडे जाण्यासाठी  स्वतःच्या कारने निघाले. 3 तासात ते त्या ठिकाणी पोचले.
         तिकडे गेल्यानंतर थोड्याच वेळात त्यांची host couple शी भेट झाली. एका पंचतारांकित hotel मधे त्यांची भेट ठरवली होती. दोघही तिथे केलेली सगळी तयारी पाहून खूप खुश झाले.  थोड्या वेळ त्यांच्या show बद्दल गप्पा झाल्या.
दोघानी त्यांचे autographs घेतले. त्यानंतर तिथे मंद सुरात music सुरु होत. host couple मधल्या त्याने "ती" ला डान्स साठी विचारल. तिने नजरेनेच त्याची परवानगी घेतली आणि ती त्याच्यासोबत डान्स साठी गेली. मग त्याने पण host couple मधल्या तिला डान्स साठी विचारल. ती लगेच तयार झाली आणि दोघही मस्त डान्स करत होते. "ती" जेव्हा आपल्या आवडीच्या host सोबत डान्स करत होती तोपर्यंत relax होती. पण जेव्हा "तो" त्याच्या आवडीच्या host सोबत डान्स करायला लागला तेव्हा मात्र "ती" अस्वथ झाली. तिचा एकच स्वभावदोष  होता की ती त्याच्याबद्दल खूपच possessive होती. त्यानंतर पूर्ण वेळ ती स्वतःचा डान्स एन्जॉय करण्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष ठेवण्यात मग्न होती. तिला सारख असच वाटत होत की "तो" आज जरा जास्तच खुलला आहे. आणि त्यांच तिच्याकडे काहीच लक्ष नाहीये. म्हणूनच "ती" पूर्ण वेळ अस्वथ होती. host ने तिला विचारले सुद्धा की काय झाले आहे? पण तिने थकले आहे इतके सांगुन वेळ मारून नेली.
          मग लगेच सगळे पुन्हा त्यांच्या टेबलवर येउन बसले. "त्या" ने विचारले की खूप त्रास होत आहे का?
तेव्हा "ती" ने काही नाही थोड़ी थकले आहे इतकच सांगितल. आणि मग थोड्याच वेळात त्यांच मस्त जेवण झाल आणि सगळी संध्याकाळ पण खूप छान गेली फ़क्त तिच्या मनात "त्याच" आजच behaviour घर करून गेल. मग रात्री खूप उशिरा गप्पा वगरे झाल्यावर त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
          खूप उशीर झाला म्हणून ती आणि तो ह्यांनी hotel मधेच एक रूम घेतली एका रात्रीसाठी. त्याला कळत होत की "तीच" काहीतरी बिनसल आहे. त्याने रूम मधे गेल्यावर तिला विचारायचा खूप प्रयत्न केला. पण तिने "काही नाही" असेच उत्तर दिले. कारण तिचा त्याच्यावर विश्वास नव्हता असे नाही. पण तिला त्याचे आजच वागणे जरा खटकले. त्याला मात्र तिच्या मनात चाललेल्या विचारांचा काही थांगपत्ता नव्हता. शेवटी विचार करता करता त्याला पण झोप लागून गेली.
          सकाळी दोघही परत जाण्यासाठी निघाले. ती थोडीशी शांत झाली होती. कारमधे त्यांच कालच्या भेटीबद्दल बोलण सुरु होत. ती त्याचा चेहरा नीट न्याहाळत होती. शेवटी तिने विचारालच की कस वाटल मग डान्स करताना? तो म्हणाला की खूप छान वाटल. तिचा चेहरा लगेच पडला. तो कार चालवत असल्यामुळे त्याच तिच्या चेहर्याकडे लक्ष नव्हत. मग तो म्हणाला की "मला अस वाटल की आपण आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अश्याच एखाद्या ठिकाणी येऊ. आणि फ़क्त दोघच मस्त एन्जॉय करू. हे ऐकल्यावर तिला लगेच त्याच्याबद्दल असा विचार केल्याबद्दल स्वतः चा राग आला. तिला त्याच्याबद्दल असा विचार केल्याचा खूप पश्चाताप झाला. तिच्या मनात लगेच असा विचार आला की तो त्या host सोबत असताना सुद्धा आपला विचार करत होता. म्हणजे त्याच आपल्यावर किती प्रेम आहे! ("आपल्या आवडीच्या व्यक्तीने आपल्यासोबत असताना दुसरयाचा विचार करण चांगल की दुसरयासोबत सोबत असताना आपला विचार करण चांगल?") तिने लगेच त्याला काल संध्याकाळपासून काय काय वाटल ते सांगितल. त्याने ते सगळ ऐकल आणि त्याच्या चेहर्यावर एक हलकस हसू ऊमटल. तो म्हणाला की "वेडाबाई पुन्हा कधीही असा विचार करू नकोस. तुझ्यासारखी गोड आणि चिडकी बायको असताना मला दुसरया कोणाचा विचार करावासा वाटेल का?" लगेचच तिच्या ओठांवरती हसू उमटले आणि तिने समाधानाने त्याच्या खांद्यावर
डोके टेकवले.


                   
          
             माझ्यासाठी सकाळी लवकर उठण्याइतकी boring गोष्ट कोणतीच नसेल. मी आत्तापर्यंत माझा सगळा अभ्यास रात्री जागूनच केला आहे. सकाळी उठणे अगदीच जीवावर यायचे माझ्या. आणि गम्मत अशी होती की जर मी ठरवल की आता लवकर झोपू अणि सकाळी फ्रेश mind मधे अभ्यास करू, तर मला झोपच लागायची नाही. सारखे दोनच विचार मनात येत रहायचे... अभ्यासाचे कोणकोणते topics वाचायचे राहिले आहेत आणि मला सकाळी वेळेवर जाग येईल का? म्हणून मग असे व्हायचे की जाऊ दे बाबा आत्ताच अभ्यास करून निवांत झोपाव... 
            सध्या मला office मधे सकाळी लवकर पोचायचे असते. त्यामुळे अभ्यास जरी सध्या संपला असेल तरी सकाळी उठणे मात्र चालूच आहे. रोज़ मी ठरवते की आज रात्री लवकर झोपू म्हणजे सकाळी नीट जाग येईल. पण जोपर्यंत stevee the TV  (आमच्या एकुलत्या एक आणि लाडक्या TV चे नाव) घरात आहे तोपर्यंत माझे लवकर झोपणे काही शक्य नाहीये. कारण सध्या IPL च्या सगळ्या matches पाहिल्याशिवाय झोपायचे नाही असा नियमच झाला होता जस काही... रात्री जवळपास 12 - 12.30 ला match संपायची. आणि मगच आम्ही झोपयाचो. आणि आता तर T - 20 वर्ल्ड कप सुरु झाला आहे म्हणजे विचारायलाच नको... 
            सकाळी उठण्यासाठी मी नेहमी 2-3 अलार्म लावते. (कारण मला एक अलार्म मधे जाग येत नाही :) ) तेव्हा सकाळी उठताना कधी कधी मला वाटत की मी तर आत्ताच झोपले होते, लगेच कशी काय सकाळ झाली? घड्याळ इतक का पळत आहे आज? "काश ये वक़्त,ये पल यही पे रुक जाये..." असे विचार generally कधी येतात आपल्या मनात  आणि माझ्या मनात मात्र सकाळी उठताना :) आणि मग शेवटचा अलार्म वाजला की मी उठते. आमची कामवाली बाई रोज़ सकाळी 6 :30 ला येते. म्हणून मग तिला सरळ सांगितले शनिवारी आणि 
रविवारी 9 पर्यंत ये. कारण मला ह्या 2 दिवसात तरी झोपेत disturbance नको असतो.
             फ़क्त काही वेळेस  मला सकाळी अगदी अलार्म वाजायच्या 5 मिनिट आधी आपोआप जाग येते. जेव्हा treaking नाहीतर पिकनिकला पहाटेच निघायचे असते, जेव्हा परीक्षा सुरु असते नाहीतर एखादा सण असतो तेव्हा... 
             मी ह्या वर्षी नविन वर्षाच्या संकल्पामधे ठरवले होते की न चुकता लवकर उठेन. पहिल्या 2 महीन्यापर्यंत टिकला माझा संकल्प आणि नंतर पुन्हा सुरु झाला माझा आळशीपणा...!!! आता पुन्हा एकदा मी रोज़ लवकर उठायचे ठरवले आहे. चला मी जात आहे आता झोपायला नाहीतर पुन्हा उशीर होईल सकाळी उठण्यासाठी...!!! :)


    
       
               मॅच delay झाल्यामुळे आम्ही जरासे गोंधळून गेलो. काय झाले ते कळत नव्हते. मग लगेच सगळ्याना फोन करून विचारत होतो की काय झाले आहे? News channels तर नक्कीच काहीतरी सांगत असतील.... तेव्हा सगळ्याना SMS येत होते आणि कळाले की stadium च्या बाहेर 2 ब्लास्ट झाले आहेत. मग लगेच घरच्यांचे आणि friends चे फोन येणे सुरू झाले की आम्ही सुखरूप आहोत की नाही ..... काय सुरू आहे इकडे? आम्हाला मधे काहीच कळत नव्हते आणि काही धोका पण नव्हता. कारण इथे सुरक्षा खूप कडक होती. आम्हाला वाटला की आता मॅच cancel झाला तर? सगळे पैसे आणि मेहनत पाण्यात आणि मूडची पण वाट लागेल. पण नंतर कळले की मॅच 1 तास उशीरा सुरू होणार आहे. हे कळल्यावर मग आमचा जीव भांड्यात पडला. :)
           हे सगळे गोंधळ सुरू असताना माझे निरीक्षण चालू होते आजूबाजूला..... पूर्ण stadium माणसानी भरून वाहत होते. सगळ्यांसोबत आम्ही पण मॅचचा माहोल आणि प्रचंड गर्दीची मजा घेत होतो. मॅच सुरू व्हायच्या आधी खेळाडूंचा ground वर सुरू असणारा सराव पण पाहायला मिळाला. थोड्याच वेळात (IPL च्या बरोबरीने प्रसिद्धी मिळालेल्या) दोन्ही teams च्या CHEER GIRLS ची entry  झाली. सगळ्या प्रेक्षकानी त्यांचे जोरदार स्वागत केले. मला पण त्यांना जवळून पाहायची इच्छा होतीच... :)   खरच त्या सही होत्या...!!! :D
          आणि एकदाचा मॅच सुरू झाला. इतके लोक आणि इतका उत्साह बघून लगेच कळत की आपल्या देशात क्रिकेट इतका का favorite game आहे ते.. :) Live मॅच पाहण्याची मजाच काही वेगळी असते. कधी कधी विश्वास बसत नाही की आपले आवडीचे players तिथे आपल्या डोळ्यासमोर खेळत आहेत. MI ची batting पहिल्यांदा होती. सगळेच सचिन च्या खेळीकडे डोळे लाऊन बसले होते. पण सचिन ह्या मॅच मधे लवकर आउट झाला त्यामुळे जरासा मूड गेला. पण बाकीच्यांनी चांगली खेळी केल्यामुळे  एकूणच MI ची धावसंख्या जबरदस्त झाली होती. चांगल्या चौकारांमुळे आणि षट्कारांमुळे सगळे stadium दनाणून गेले होते. RCB  ने सुद्धा चांगली खेळी करायचा प्रयत्न केला पण  एकामागोमाग एक सगळे आउट होत गेले आणि MI चांगल्या फरकाने हा मैच जिंकले.
          हा शनिवार मनसोक्त enjoy करून आम्ही बाहेर पडलो. घरी जाताना तूफ़ान पाऊस होता. तसेच भिजत भिजत घरी गेलो. घरी पोचायला जवळपास 9.30 वाजले होते. दिवसभर इतक थकूनही काहीच थकवा जाणवत नव्हता. आणि असा आमचा  शनिवार काहीही ठरवलेला नसताना IPLमय झाला. :)
अरे हो माझ्याकडून "Mumbai Indians" ला final मॅच साठी भरभरून शुभेच्छा...!!!


   
              
              सध्या सगळीकडे IPL चे वारे वाहत आहे. आणि आशिषला मॅच तुफान आवडत असल्यामुळे आमच्याकडे सुद्धा मॅच पाहिला नाही  असा एकही दिवस जात नाही. मी फक्त 2  Teams ना मनापासून support करते.... "Mumbai Indians" आणि "Royal Challengers Bangalore (RCB)" (बंगलोरला रहात असल्यामुळे करत असेन कदाचित  :) ) IPL चा live मॅच बघण्याची आमची खूप इच्छा होती. म्हटला की शनिवारचा 17 एप्रिलचा मॅच  बघावा कारण तो MI आणि RCB मधे होता... तो पण बंगलोर मधे..... पण लवकर tickets book  न केल्यामुळे मॅच बघण्याचा विचार आम्ही सोडून दिला होता.
           अचानक गुरुवारी आशिष म्हणाला की त्याच्या काही friends ना पण हा मॅच पाहायचा आहे... tickets कोणाकडेच नाहीयेत.... आपण जाऊन तर पाहूया कुठून tickets मिळवता आली तर मॅच पाहू नाहीतर येऊ घरी....
           मग शनिवारी सकाळी आम्ही नाश्ता केला. पटकन काही महत्वाची काम करून stadium कडे निघालो. रस्त्यात आमच्यासोबत मॅच पाहायला येणारा friend पण आम्हाला join झाला. आणि एकजण तिकडे पोचला होता आणि आमची वाट पाहत होता.  आशिषकडे असणारा RCB चा T-Shirt आम्ही सोबत बॅग मधे घेतला होताच.... (अरे हो आशिषच्या supporting list  मधे आधी RCB आणि नंतर MI आहे. ) मी  MI ला support करत असल्यामुळे मला  MI चा T-Shirt हवा होता. पण असे ठरवले की tickets  मिळाले तर घेऊ. मॅच ची वेळ 4 वाजताची होती. पण tickets मिळवायचे असल्यामुळे आम्ही दुपारी 12 वाजताच बाहेर पडलो होतो.
           आणि शेवटी काहीतरी करून (समझनेवाले को इशारा काफी है ) :) tickets मिळवले एकदाचे...... !!! इतका आनंद झाला तेव्हा की बस... जग जिंकल्यासारखे भाव होते चेहर्यावर...... मग लगेच ठरल्याप्रमाणे माझ्यासाठी MI चा T-Shirt घेतला. आणि अशी सगळी जय्यत तयारी करून आम्ही 3 वाजता मधे पोचलो. मग लगेच घरी दोघांच्याही आई बाबाना फोन करून आम्ही इथे आल्याचे सांगितले. (कारण तोपर्यंत कोणालाच सांगितले नव्हते.) मग सगळ्या friends ना पण ही आम्ही इथे असल्याचे कळवले. पण सगळा मनासारख कस घडेल ना? थोड्याच वेळात ground वरती board झळकत होता.. "MATCH DELAYED ". :(

क्रमश:





प्रत्येक वेळेस पाऊस आला की आठवणी सोबत घेऊन येतो अस मला वाटत..... काल दुपारी मी ऑफीस मधे असताना बाहेर पाहिल तर मस्त पाऊस पडत होता. जस तहानलेल्याला पाणी मिळाल्यावर वाटेल तसच वाटत जेव्हा आपण उन्हाने वैतागलेले असतो आणि अचानक पाऊस येतो....
पाऊस आला की मस्त गोष्टी सुचायाला लागतात. मला पाऊस पडताना काही गोष्टी खूप कराव्याश्या वाटतात.

१. आधी पटकन जाऊन पावसात भिजण.... (थोडस तरी....)

२. प्लेट मधे गरम गरम कांदाभजी आणि हातात चहाचा वाफाळता कप घेऊन घरातून पाऊस पाहाण......

३. जर बाहेर असू तर मुसळधार पावसात पाणीपुरी खाण्याची मजा काही औरच असते.....

४. खूप पाऊस पडत असताना आइसक्रीम खाण......

५. आपल्या आवडत्या व्याक्तिबरोबर भर पावसात भटकण........

६. रात्रीची वेळ असेल तर अंगावर रजई घेऊन हातात एखाद मस्त पुस्तक घेऊन पावसाचा आवाज ऐकत बेडवर पडून रहाण....

७. पाऊस पडत असताना एखादी मस्त गझल लावून पावसाचा आस्वाद घेण..

८. जर सुट्टीचा दिवस असेल आणि डोळे उघडतानाच खिडकीतून पाऊस दिसत असेल तर पुन्हा रजई मधे शिरून अजून थोडावेळ झोपण... (ज्याना सकाळी झोपायला आवडत त्यानाच ह्यातल सुख कळेल. ..)

९. जर पावसाचा अंदाज असेल तर सगळ्यांचा ग्रूप बनवून ट्रेक वर जाण....

यापैकी एखादीतरी गोष्ट प्रत्येकाने केली असेलच.... आणि जर नसेल केली तर लवकरच करता येणार आहे कारण पावसाळा आता जवळ येत आहे म्हटल..... :)





        खूपच दिवस झाले आहेत पहिली पोस्ट टाकून... सध्या मी इतकी busy झाले आहे की वेळच मिळत नाहीये पोस्ट टाकायला....  शनिवार आणि रविवार म्हणजे कसे निवांत दिवस असतात. म्हटल चला ह्या  weekend ला जरा पाककौशल्य पणाला लावाव... 
       शनिवारचा संध्याकाळचा बेत म्हणजे भेळ केली होती. मस्तच झाली होती..   मनसोक्त भेळ खाऊन आम्ही रात्रीच्या जेवणाला बुट्टी मारली. :)  आणि त्यानंतर Cold Coffee On it's Top अहाहाहा... शनिवारची सांगता तृप्ततेने झाली..  अरे हो पण ह्या मेनुचे  फोटो नाही काढले... :( 
       रविवारचा दिवस जरा आरामात सुरु झाला. आज काहीतरी नविन बनवायचा बेत माझ्या मनात घोळत होता. आशीषला  कोथिम्बिरीच्या वड्या  खूप आवडतात आणि मी त्या कधीच केल्या नव्हत्या. म्हटल बघुया जमतायेत का ते..... मग लगेच आईना (आशीषच्या आईला) फ़ोन केला... सगळी कृति नीट समजावून घेतली.  अधून मधून जरा चवीचा अंदाज़ घेत होते मी... पण चव हवी तशी येत नव्हती... मग पुन्हा २-३ अजुन फ़ोन करून जेव्हा confirm केल तेव्हा जरा मनासारखी चव झाली. ( फोटो टाकला आहे वर.. ) आणि सोबत कांद्याची थालीपीठ पण केली होती. Lunch menu तर मस्त झाला... भूक पण खूप लागली होती..  म्हणून दोघही मस्त तुटून पडलो. आणि दोन घास जास्तच गेले पोटात...
        सध्या IPL चे वारे वाहत असल्यामुळे बाकी गोष्टींसाठी वेळच मिळत नाहीये. मग काम आणि match ह्याच schedule manage कराव लागत... :)
        मग संध्याकाळी वाटायला लागला की संपला weekend.. :( उद्यापासून पुन्हा धावपळ सुरु... सकाळी लवकर उठा मग Office आणि नंतर घर... पण मनासारखा weekend  घालवल्याच समाधान काही औरच असत.. एक energy मिळते पुढचा weekend येइपर्यंत....
        मला ही post लवकरच टाकायची होती पण जरा उशीरच झाला... हरकत नाही... पुढची पोस्ट अगदी वेळेत ब्लॉग वर असेल... चला मी झोपते आता नाहीतर सकाळी वाट लागेल माझी... :)