माझ्यासाठी सकाळी लवकर उठण्याइतकी boring गोष्ट कोणतीच नसेल. मी आत्तापर्यंत माझा सगळा अभ्यास रात्री जागूनच केला आहे. सकाळी उठणे अगदीच जीवावर यायचे माझ्या. आणि गम्मत अशी होती की जर मी ठरवल की आता लवकर झोपू अणि सकाळी फ्रेश mind मधे अभ्यास करू, तर मला झोपच लागायची नाही. सारखे दोनच विचार मनात येत रहायचे... अभ्यासाचे कोणकोणते topics वाचायचे राहिले आहेत आणि मला सकाळी वेळेवर जाग येईल का? म्हणून मग असे व्हायचे की जाऊ दे बाबा आत्ताच अभ्यास करून निवांत झोपाव... 
            सध्या मला office मधे सकाळी लवकर पोचायचे असते. त्यामुळे अभ्यास जरी सध्या संपला असेल तरी सकाळी उठणे मात्र चालूच आहे. रोज़ मी ठरवते की आज रात्री लवकर झोपू म्हणजे सकाळी नीट जाग येईल. पण जोपर्यंत stevee the TV  (आमच्या एकुलत्या एक आणि लाडक्या TV चे नाव) घरात आहे तोपर्यंत माझे लवकर झोपणे काही शक्य नाहीये. कारण सध्या IPL च्या सगळ्या matches पाहिल्याशिवाय झोपायचे नाही असा नियमच झाला होता जस काही... रात्री जवळपास 12 - 12.30 ला match संपायची. आणि मगच आम्ही झोपयाचो. आणि आता तर T - 20 वर्ल्ड कप सुरु झाला आहे म्हणजे विचारायलाच नको... 
            सकाळी उठण्यासाठी मी नेहमी 2-3 अलार्म लावते. (कारण मला एक अलार्म मधे जाग येत नाही :) ) तेव्हा सकाळी उठताना कधी कधी मला वाटत की मी तर आत्ताच झोपले होते, लगेच कशी काय सकाळ झाली? घड्याळ इतक का पळत आहे आज? "काश ये वक़्त,ये पल यही पे रुक जाये..." असे विचार generally कधी येतात आपल्या मनात  आणि माझ्या मनात मात्र सकाळी उठताना :) आणि मग शेवटचा अलार्म वाजला की मी उठते. आमची कामवाली बाई रोज़ सकाळी 6 :30 ला येते. म्हणून मग तिला सरळ सांगितले शनिवारी आणि 
रविवारी 9 पर्यंत ये. कारण मला ह्या 2 दिवसात तरी झोपेत disturbance नको असतो.
             फ़क्त काही वेळेस  मला सकाळी अगदी अलार्म वाजायच्या 5 मिनिट आधी आपोआप जाग येते. जेव्हा treaking नाहीतर पिकनिकला पहाटेच निघायचे असते, जेव्हा परीक्षा सुरु असते नाहीतर एखादा सण असतो तेव्हा... 
             मी ह्या वर्षी नविन वर्षाच्या संकल्पामधे ठरवले होते की न चुकता लवकर उठेन. पहिल्या 2 महीन्यापर्यंत टिकला माझा संकल्प आणि नंतर पुन्हा सुरु झाला माझा आळशीपणा...!!! आता पुन्हा एकदा मी रोज़ लवकर उठायचे ठरवले आहे. चला मी जात आहे आता झोपायला नाहीतर पुन्हा उशीर होईल सकाळी उठण्यासाठी...!!! :)


This entry was posted on 11:41 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

2 comments:

    गणेश said...

    Uttam!!!

  1. ... on October 13, 2010 at 10:28 PM  
  2. Sagar Kokne said...

    पोस्टची वेळ तर सकाळी ११.११ ची आहे !
    असो सकाळी लवकर उठायला आम्हाला ही आवडत नाही.

  3. ... on December 21, 2011 at 5:00 PM