तो आणि ती ह्यांच लग्न होउन काही महिनेच झाले होते. आता कुठे ते एकमेकाना नीट ओळखायला लागले होते. तो म्हणजे एक प्रेमळ,समंजस आणि व्यवहाराच भान असणारा नवरा आणि ती पण एक थोडीशी हट्टी - चिडचिडी आणि हळवी बायको... पण ते दोघ नवरा बायको पेक्षा एकमेकांचे मित्र जास्त होते. एकमेकाना चिडवण,  रूसण, मनवण ह्यामुळे  त्यांच्या नात्यात गोडवा टिकून होता...
       दोघांनाही movies ची खूप आवड होती. असच ते एकदा TV पाहत असताना त्याना असे कळाले की एक contest आहे. आणि त्यात जे couple जिंकेल त्यांना त्या शो मधल्या host couple सोबत डिनर साठी जाता येणार आहे. त्यांना दोघांनाही त्या host couple ला भेटायची खूप इच्छा होती कारण ते त्यांचे आवडते कलाकार होते. त्यांनी सहजच गम्मत म्हणून त्या contest मधे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पाठवले आणि ते ह्या गोष्टीला विसरून पण गेले.
       एका दिवशी अचानक त्यांना फ़ोन आला की ते ही contest जिंकले आहेत आणि त्यांना डिनर साठी पुढच्या आठवड्यात मुंबईला जायचे आहे. ते दोघे पुण्याला रहात असल्यामुळे त्यांना जाणे काही अवघड नव्हते. मग दोघांनीही त्या खास दिवसासाठी मस्त shopping केली आणि आपल्या सगळ्या जवळच्या मित्र मैत्रिणीना पण सांगितले. सगळ्यांचे अभिनंदन झेलून दोघही मस्त मूड मधे होते त्या दिवशी. मग त्यांनी त्या शो मधल्या लोकांशी
फ़ोन वर बोलून भेटायची जागा वगरे सगळे माहित करून घेतले. ठरलेल्या दिवसाच्या एक दिवस आधी तिकडे जाण्यासाठी  स्वतःच्या कारने निघाले. 3 तासात ते त्या ठिकाणी पोचले.
         तिकडे गेल्यानंतर थोड्याच वेळात त्यांची host couple शी भेट झाली. एका पंचतारांकित hotel मधे त्यांची भेट ठरवली होती. दोघही तिथे केलेली सगळी तयारी पाहून खूप खुश झाले.  थोड्या वेळ त्यांच्या show बद्दल गप्पा झाल्या.
दोघानी त्यांचे autographs घेतले. त्यानंतर तिथे मंद सुरात music सुरु होत. host couple मधल्या त्याने "ती" ला डान्स साठी विचारल. तिने नजरेनेच त्याची परवानगी घेतली आणि ती त्याच्यासोबत डान्स साठी गेली. मग त्याने पण host couple मधल्या तिला डान्स साठी विचारल. ती लगेच तयार झाली आणि दोघही मस्त डान्स करत होते. "ती" जेव्हा आपल्या आवडीच्या host सोबत डान्स करत होती तोपर्यंत relax होती. पण जेव्हा "तो" त्याच्या आवडीच्या host सोबत डान्स करायला लागला तेव्हा मात्र "ती" अस्वथ झाली. तिचा एकच स्वभावदोष  होता की ती त्याच्याबद्दल खूपच possessive होती. त्यानंतर पूर्ण वेळ ती स्वतःचा डान्स एन्जॉय करण्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष ठेवण्यात मग्न होती. तिला सारख असच वाटत होत की "तो" आज जरा जास्तच खुलला आहे. आणि त्यांच तिच्याकडे काहीच लक्ष नाहीये. म्हणूनच "ती" पूर्ण वेळ अस्वथ होती. host ने तिला विचारले सुद्धा की काय झाले आहे? पण तिने थकले आहे इतके सांगुन वेळ मारून नेली.
          मग लगेच सगळे पुन्हा त्यांच्या टेबलवर येउन बसले. "त्या" ने विचारले की खूप त्रास होत आहे का?
तेव्हा "ती" ने काही नाही थोड़ी थकले आहे इतकच सांगितल. आणि मग थोड्याच वेळात त्यांच मस्त जेवण झाल आणि सगळी संध्याकाळ पण खूप छान गेली फ़क्त तिच्या मनात "त्याच" आजच behaviour घर करून गेल. मग रात्री खूप उशिरा गप्पा वगरे झाल्यावर त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
          खूप उशीर झाला म्हणून ती आणि तो ह्यांनी hotel मधेच एक रूम घेतली एका रात्रीसाठी. त्याला कळत होत की "तीच" काहीतरी बिनसल आहे. त्याने रूम मधे गेल्यावर तिला विचारायचा खूप प्रयत्न केला. पण तिने "काही नाही" असेच उत्तर दिले. कारण तिचा त्याच्यावर विश्वास नव्हता असे नाही. पण तिला त्याचे आजच वागणे जरा खटकले. त्याला मात्र तिच्या मनात चाललेल्या विचारांचा काही थांगपत्ता नव्हता. शेवटी विचार करता करता त्याला पण झोप लागून गेली.
          सकाळी दोघही परत जाण्यासाठी निघाले. ती थोडीशी शांत झाली होती. कारमधे त्यांच कालच्या भेटीबद्दल बोलण सुरु होत. ती त्याचा चेहरा नीट न्याहाळत होती. शेवटी तिने विचारालच की कस वाटल मग डान्स करताना? तो म्हणाला की खूप छान वाटल. तिचा चेहरा लगेच पडला. तो कार चालवत असल्यामुळे त्याच तिच्या चेहर्याकडे लक्ष नव्हत. मग तो म्हणाला की "मला अस वाटल की आपण आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अश्याच एखाद्या ठिकाणी येऊ. आणि फ़क्त दोघच मस्त एन्जॉय करू. हे ऐकल्यावर तिला लगेच त्याच्याबद्दल असा विचार केल्याबद्दल स्वतः चा राग आला. तिला त्याच्याबद्दल असा विचार केल्याचा खूप पश्चाताप झाला. तिच्या मनात लगेच असा विचार आला की तो त्या host सोबत असताना सुद्धा आपला विचार करत होता. म्हणजे त्याच आपल्यावर किती प्रेम आहे! ("आपल्या आवडीच्या व्यक्तीने आपल्यासोबत असताना दुसरयाचा विचार करण चांगल की दुसरयासोबत सोबत असताना आपला विचार करण चांगल?") तिने लगेच त्याला काल संध्याकाळपासून काय काय वाटल ते सांगितल. त्याने ते सगळ ऐकल आणि त्याच्या चेहर्यावर एक हलकस हसू ऊमटल. तो म्हणाला की "वेडाबाई पुन्हा कधीही असा विचार करू नकोस. तुझ्यासारखी गोड आणि चिडकी बायको असताना मला दुसरया कोणाचा विचार करावासा वाटेल का?" लगेचच तिच्या ओठांवरती हसू उमटले आणि तिने समाधानाने त्याच्या खांद्यावर
डोके टेकवले.


This entry was posted on 6:34 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

1 comments:

    Joshyancha Karta said...

    chanch aahe... lekhanatalw wegwegale pailu disat aahet.. mainly wishay ekdum wegawegale aahet.. good one :)

  1. ... on June 23, 2010 at 8:55 PM