काही दिवसांपूर्वीच मी PINK movie पाहिला. मला खूप आवडला म्हणून त्याविषयी काही लिहीतीये.
जन्म झाल्यापासून मुलगी आणी मुलगा हा भेद निसर्गाने केला आहे पण समाजाने तो चुकीच्या पद्धतीने लादत रहावा असे नाही. जन्म देण्याच वरदान आणी जबाबदारी दोन्ही स्त्री ला मिळाली आहे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की सगळी बंधने तिच्यावरच असावेत. भारतीय समाजाची मानसिकता खूप परखडपणे इथे मांडली आहे.
ह्या movie चा plot असा आहे की एक मुलगी एका मुलावर attempt to rape ची case file करते. आणी तो मुलगा ह्या मुलीला Call Girl / sex worker ठरवतो आणी स्वतः सुटण्याचा प्रयत्न करतो. कोर्टमधे अमिताभ मुलींकडून ही case लढत असतो. तेव्हा त्याने मांडलेले मुद्दे खूप सुरेख आहेत.
मुलींनी रात्री घराबाहेर राहू नये आणी कामानिमित्त ती रहात असेल तर ती "तसलीच" असण्याच लेबल लागत. मुलींनी skirts - jeans सारखे कपडे घालू नयेत कारण असे कपडे वाईट प्रकार होण्यासाठी जबाबदार असतात. Social drinking करणाऱ्या मुली वाईट चालीच्या असतात पण मुलांनी drink केल तर ते फक्त health hazard आहे. जर एखादी मुलगी Party ला जात असेल आणी drink करत असेल तर तिच्यासोबत काहीही करता येईल असा मुलांचा समज असतो. एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत कुठे बाहेर गेली तर त्यानंतरच्या प्रत्येक गोष्टीला तिची संमती समजली जाते. कारण काही गैरप्रकार झाला तर मुलाला काहीही न विचारता मुलीलाच म्हणतात की तू का तिथे का गेली होतीस?
अमिताभने भारतीय विचारांचा संकुचितपणा दाखवून देतानाच मुलामुलींना खूप काही सांगितले आहे. प्रशासनावर विश्वास आणी आपल्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्याची माहिती असेल तर आपण आपल्या हक्कांसाठी लढू शकतो असा दावा केला आहे. मुलांनाही आम्ही equality ला मानतो पण तसे वागतो का ह्यावर विचार करायला लावला आहे. तसच मुलांना कोणत्याही स्त्री चा एक व्यक्ती म्हणून आदर करणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित केले आहे.
Movie मधे शेवटच्या युक्तीवादात असे सांगितले आहे की - स्त्री जेव्हा "नाही" म्हणते तेव्हा हा शब्द कृती थांबवण्याचा संकेत आहे आणी तो पाळलाच पाहिजे. ह्या Movie मधली मला आवडलेली काही वाक्य खाली देत आहे.
- "हमारे यहाँ घडी की सुई लडकीयोंका character decide करती है"
- "Our system thrashes weak people"
- "अगर लडकीया लडकोंके साथ dinner या drinks के लिये जाती है तो वो उनकी अपनी choice होती है available होने का sign board नही"
- "ना" सिर्फ एक शब्द नाही है... अपने आप मे पूर्ण वाक्य है
- "ना" सिर्फ एक शब्द नाही है... अपने आप मे पूर्ण वाक्य है
- "आज तक हम गलत direction मे effort करते रहे है... We should save our boys not our girls... because if we will save our boys then our girls will be safe".
हा movie आवर्जून पाहण्यासारखा आहे. कारण हा movie पाहिल्यानंतर प्रत्येकजण, आपण खरच प्रगत आणी स्त्री समानता मानणारे आहोत का हे पडताळून बघेल ह्याची मला खात्री आहे.
6 comments:
Unknown said...
Unknown said...
Apratim!!
Sayali said...
Just loved this movie.. Sentence by sentence.. It's true..
Sayali said...
Just loved this movie.. Sentence by sentence.. It's true..
Anonymous said...
आता पाहा live tv free
http://freetvsource.blogspot.com
Ashokkumar Bhangare said...
Very nice movie