खूपच दिवस झाले आहेत पहिली पोस्ट टाकून... सध्या मी इतकी busy झाले आहे की वेळच मिळत नाहीये पोस्ट टाकायला.... शनिवार आणि रविवार म्हणजे कसे निवांत दिवस असतात. म्हटल चला ह्या weekend ला जरा पाककौशल्य पणाला लावाव...
शनिवारचा संध्याकाळचा बेत म्हणजे भेळ केली होती. मस्तच झाली होती.. मनसोक्त भेळ खाऊन आम्ही रात्रीच्या जेवणाला बुट्टी मारली. :) आणि त्यानंतर Cold Coffee On it's Top अहाहाहा... शनिवारची सांगता तृप्ततेने झाली.. अरे हो पण ह्या मेनुचे फोटो नाही काढले... :( रविवारचा दिवस जरा आरामात सुरु झाला. आज काहीतरी नविन बनवायचा बेत माझ्या मनात घोळत होता. आशीषला कोथिम्बिरीच्या वड्या खूप आवडतात आणि मी त्या कधीच केल्या नव्हत्या. म्हटल बघुया जमतायेत का ते..... मग लगेच आईना (आशीषच्या आईला) फ़ोन केला... सगळी कृति नीट समजावून घेतली. अधून मधून जरा चवीचा अंदाज़ घेत होते मी... पण चव हवी तशी येत नव्हती... मग पुन्हा २-३ अजुन फ़ोन करून जेव्हा confirm केल तेव्हा जरा मनासारखी चव झाली. ( फोटो टाकला आहे वर.. ) आणि सोबत कांद्याची थालीपीठ पण केली होती. Lunch menu तर मस्त झाला... भूक पण खूप लागली होती.. म्हणून दोघही मस्त तुटून पडलो. आणि दोन घास जास्तच गेले पोटात...
सध्या IPL चे वारे वाहत असल्यामुळे बाकी गोष्टींसाठी वेळच मिळत नाहीये. मग काम आणि match ह्याच schedule manage कराव लागत... :)
मग संध्याकाळी वाटायला लागला की संपला weekend.. :( उद्यापासून पुन्हा धावपळ सुरु... सकाळी लवकर उठा मग Office आणि नंतर घर... पण मनासारखा weekend घालवल्याच समाधान काही औरच असत.. एक energy मिळते पुढचा weekend येइपर्यंत....
मला ही post लवकरच टाकायची होती पण जरा उशीरच झाला... हरकत नाही... पुढची पोस्ट अगदी वेळेत ब्लॉग वर असेल... चला मी झोपते आता नाहीतर सकाळी वाट लागेल माझी... :)