प्रत्येक वेळेस पाऊस आला की आठवणी सोबत घेऊन येतो अस मला वाटत..... काल दुपारी मी ऑफीस मधे असताना बाहेर पाहिल तर मस्त पाऊस पडत होता. जस तहानलेल्याला पाणी मिळाल्यावर वाटेल तसच वाटत जेव्हा आपण उन्हाने वैतागलेले असतो आणि अचानक पाऊस येतो....
पाऊस आला की मस्त गोष्टी सुचायाला लागतात. मला पाऊस पडताना काही गोष्टी खूप कराव्याश्या वाटतात. १. आधी पटकन जाऊन पावसात भिजण.... (थोडस तरी....)
२. प्लेट मधे गरम गरम कांदाभजी आणि हातात चहाचा वाफाळता कप घेऊन घरातून पाऊस पाहाण......
३. जर बाहेर असू तर मुसळधार पावसात पाणीपुरी खाण्याची मजा काही औरच असते.....
४. खूप पाऊस पडत असताना आइसक्रीम खाण......
५. आपल्या आवडत्या व्याक्तिबरोबर भर पावसात भटकण........
६. रात्रीची वेळ असेल तर अंगावर रजई घेऊन हातात एखाद मस्त पुस्तक घेऊन पावसाचा आवाज ऐकत बेडवर पडून रहाण....
७. पाऊस पडत असताना एखादी मस्त गझल लावून पावसाचा आस्वाद घेण..
८. जर सुट्टीचा दिवस असेल आणि डोळे उघडतानाच खिडकीतून पाऊस दिसत असेल तर पुन्हा रजई मधे शिरून अजून थोडावेळ झोपण... (ज्याना सकाळी झोपायला आवडत त्यानाच ह्यातल सुख कळेल. ..)
९. जर पावसाचा अंदाज असेल तर सगळ्यांचा ग्रूप बनवून ट्रेक वर जाण....
यापैकी एखादीतरी गोष्ट प्रत्येकाने केली असेलच.... आणि जर नसेल केली तर लवकरच करता येणार आहे कारण पावसाळा आता जवळ येत आहे म्हटल..... :)
5 comments:
Sayali said...
oye hoye... bhari han... mst lihila aahe... Hey deva Banglore madhe ajun thoda paus padu de aani aamhala asach chan blog milu de.. :) good keep it up, m waiting for the next blog!
Ashish said...
खिडकीतून बाहेर पाउस बघताना "गारवा" ऐक. बघ मझी आठवण येते का?
नागेश देशपांडे said...
एक नंबर, खरचं असेच काहीसे करावे वाटते प्रत्येकवेळी पाऊस पडतो तेव्हा...
पुढील लेखनासाठी शुभेच्छा...
Anonymous said...
jhakas!!mast aahe.really very good...
Anonymous said...
wow great this is use full for me in elucation compatition