ब्लॉग सुरु करावा अशी माझी खूप दिवसापासून इच्छा होती. पण  काही ना काही कारणाने राहूनच गेल...  मग म्हटल चला होळीच्या शुभमुहूर्तावर ब्लॉग सुरु करावा. आणि मग जोरदार तयारी सुरु झाली ती ब्लॉग च्या नावाच्या शोधापासून... मग मी लगेच आशिषला म्हटल की ब्लॉगच नाव शोधायला तुझी मदत पाहिजे... मग दोघही मस्त नाव शोधायला लागलो... विचार करतानाच अशी भन्नाट नाव सुचत होती की बस... त्यातली कही नाव सांगायची म्हटल तर...
चिंधी
, भन्नाट, चम्पक,चमन झींगा, कट्टा, जोशीपुराण, ढक्कन......
वाचून पण हसायला येत असेल ना... पण काय करणार हे सध्या नेहमी तोंडात असणारे शब्द आहेत. :) काही चांगली नाव पण सुचली होती ती अशी...
मनात माझ्या, मनातल  काहीतरी, असच कधीतरी, गप्पांचा अड्डा, गप्पागोष्टी, गारवा, मनातला उन पाऊस, वाचून तर बघा, मन माझे, मी माझी .....

मग कोणत नाव असाव ब्लॉगच ते ठरवण्यात अजून वेळ जायला लागला. एकदा असच मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते की मी ब्लॉग सुरु करत आहे... तर ती म्हणाली "सहीच ना...." तेव्हा वाटला की हेच नाव का असू  नये माझ्या ब्लॉगच... मग लगेच आशिषला विचारल कस वाटत आहे हे नाव? त्याने ग्रीन सिग्नल दिला आणि मग हुश्श झाल मला. आणि ह्या सगळ्या नावांमधे शेवटी मी नाव ठरवल एकदाच... "सहीच ना....!!!!" :))
इथे काय लिहायच आहे ते मी अजून ठरवल नाहीये पण मला जे जे लिहावस वाटेल ते नक्की लिहिन....
पाहुया आता माझा ब्लॉग कसा मोठा होइल ते.... :)


This entry was posted on 5:28 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

2 comments:

    Sayali said...

    Hmmmmmmmmmmm.... Good work didi!
    Keep it up!
    Tuzya blog la mazyakadun bharbharun shubheccha!!
    All the best! :)

  1. ... on March 1, 2010 at 10:27 PM  
  2. Keya said...

    Sahich na!! good name n good start..keep posting often !

  3. ... on March 3, 2010 at 10:08 AM