मृत्युंजय ही कादंबरी जेव्हा मी पहिल्यांदा हातात घेतली तेव्हा ती पूर्ण
वाचल्याशिवाय खाली ठेवताच आली नाही. अतिशय सुंदर आणि रोमांचक पद्धतीने कथा
गुंफली आहे. शिवाजी सावंत ह्यांच्या छावा आणि युगंधर ही पुस्तके पण वाचली आहेत. पण मृत्युंजय ह्या पुस्तकाच वेगळेपण म्हणजे ह्यातली भाषाशैली…. हे पुस्तक खूप साऱ्या पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. शिवाजी सावंत ह्यांना "मुर्तीदेवी" पुरस्कार मिळाला आहे मृत्युंजयसाठी. आणि हे पुस्तक नऊ भाषांमध्ये भाषांतरीत केले आहे. कर्णाच्या जीवनावर आधारीत अजून एक पुस्तक आहे राधेय पण मला खर सांगायचं तर मृत्युंजय जास्त आवडल आणि मनाला भावल…
खूप सुंदर पद्धतीने सगळी कहाणी कर्ण ह्या एका योध्याभोवती फिरते जो सर्वगुणसंपन्न असूनही महाभारतात नेहमीच दुर्लक्षित राहिला. जात-वंश -कूळ ह्या गोष्टींना महत्व अगदी प्राचीन काळापासून आहे. कर्ण हा कुंती आणि सूर्याचा (कुंतीला लग्नाआधी झालेला) पुत्र होता. त्याला जन्मतः कवचकुंडले मिळाली होती ज्यांच्यात अद्भूत शक्ती होती. कर्णाला कुंतीने गंगेत सोडून दिले आणि तो एका भल्या माणसाकडे त्याचा मुलगा म्हणून वाढू लागला. कर्णाला त्याच्या जन्माच्या अजब रहस्यामुळे (कुंतिपुत्र असूनही तो एका सारथीचा मुलगा म्हणून वाढत असल्यामुळे) सगळीकडे आयुष्यभर अपमानित केले गेले. कर्णाला द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती पण ते फक्त क्षत्रियांनाच शिकवत असल्यामुळे त्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिला. मग त्याने परशुरामाकडे शिकायचे ठरवले पण त्याचा नियम असा होता की तो फक्त ब्राह्मणानाच शिकवत असे. पण कर्णाला त्यांच्याकडून ब्रम्हास्त्र शिकून घ्यायचे होते म्हणून तो खोटे बोलून परशुरामाचा शिष्य बनला. पण त्याचे खोटे उघडकीला आल्यावर परशुरामाचा नियम मोडल्यामुळे त्याने कर्णाला शाप दिला कि जेव्हा त्याला ह्या ब्राह्मस्त्राची सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा त्याला ते आठवणार नाही.
द्रौपदीचे स्वयंवर होते तेव्हा तिथे पांडव, कौरव आणि कर्ण असे सगळे आले होते. पण कर्ण समोर येताक्षणी तिने "मी सूतपुत्राला वरणार नाही" असा सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला. कर्णाच्या ह्या सगळ्या जीवनात त्याची प्रेमळ अर्धांगिनी वृषाली नेहमीच त्याच्यासोबत होती. त्याच्या जीवनातल्या कटू प्रसंगांची तीव्रता वृषालीने केलेल्या हळुवार प्रेमाच्या वर्षावाने कमी झाली. कर्ण त्याच्या संसारीक जीवनात सुखी आणि समाधानी होता.
कर्णाचा दानशूरपणाची सगळीकडे ख्याती होती. कोणीही याचक कर्णाकडे आल्यावर रित्या हातांनी जात नसे. महाभारतातील शेवटचे युद्ध सुरु होण्याआधी कुंती कृष्णासोबत त्याच्याकडे आली व तिने तो तिचा पुत्र असल्याचे सांगितले. आणि त्याला पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी विचारले. सगळ्यांकडून अवहेलना मिळालेल्या कर्णाला फक्त दुर्योधनाने जवळ केल्यामुळे तो शेवटपर्यंत दुर्योधनाशी मैत्रीच्या नात्यामुळे प्रामाणिक राहिला. पण त्याने वचन दिले की पांडवांपैकी तिचा एक तरी पुत्र जिवंत राहील. त्याने आपली कवचकुंडलेपण कुंतीला देऊन टाकली. कर्णाच्या दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी एका इंद्र याचकाचे रूप घेऊन आला. कर्ण नुकताच अंघोळ करून आल्यामुळे त्याच्याजवळ काहीच नव्हते तेव्हा इंदाने त्याच्याकडे आर्थिक मदतीची याचना केली. तेव्हा सगळे काही कळूनही थोडाही विचार न करता त्याने आपला सोन्याचा दात फोडून त्याला दिला.
अश्या ह्या कर्णाला इतक्या सगळ्या गोष्टी असूनही अहंकारी असल्याचे म्हटले गेले. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर कर्णाबद्दल आपण हळुवार होतो. त्याच्याकडे आणि महाभारताकडे पहायची एक वेगळी दृष्टी मिळते. जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये ब्रह्मास्त्र न आठवल्यामुळे शेवटच्या क्षणी अर्जुनाकडून अंत होतो तेव्हा मन आतून हेलावते. असा हा कर्ण - एक चांगला पुत्र, चांगला पती, चांगला मित्र आणि सर्वगुणसंपन्न योद्धा आपल्या मनातून कधीच पुसला जात नाही.….