दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीत काही गोष्टी मात्र नित्यनेमाने असतात... पहाटे उठून उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान... लक्ष्मिपूजनाला केलेली पूजा, पाडवा, भाउबीज... आणि खास म्हणजे...
रांगोळी काढलेले स्वागत करणारे घर...
मनसोक्त केलेला दिवाळीचा फराळ
दिव्यांनी उजळून टाकलेले घर..!!
सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा...!!!